इर्शाळवाडी दुर्घटनेतुन सरकारने घेतला धडा; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील खालापूरमधल्या इर्शाळवाडी येथे 19 जुलै च्या मध्यरात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 15 ते 20 घरे मातीच्या ढिगार्‍याखाली दाबली गेली. या घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 93 जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. इर्शाळवाडी घटनेचा धडा घेऊन त्यांनी राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. इर्शाळवाडी घटनेनंतर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याचवेळी दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षा ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यात पुन्हा इर्शाळवाडी सारखी दुर्घटना घडू नये, यासाठी नागरिकांच्या सुरक्षितेचा विचार करून इर्शाळवाडीतील रहिवाशांचे सिडकोच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर राज्य सरकारने ताबडतोब एक बैठक बोलावली होते.या बैठकीमध्ये गावची परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत प्रशासनाकडून त्यांना सर्व मदत पोहोचवण्यात येईल हा निर्णय घेण्यात आला. याचवेळी, इर्शाळवाडीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे यावर देखील मंत्रिमंडळात एकमत झाले.

सध्या इर्शाळवाडीत बचावकार्य पथक, टीडीआरएफचे, स्थानिक कर्मचारी, पोलिस अधिकारी, डॉक्टर्स, रुग्णवाहिका तळ ठोकून आहे. तिथल्या स्थानिकांना मदत करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. तसेच दुर्घटना स्थळी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सर्व घटनेचा आढावा घेतला आहे. बुधवारी रात्री संपूर्ण गाव झोप येत असताना इर्शाळवाडी वर दरड कोसळली. सकाळी पाहिल्यानंतर संपूर्ण गाव मातीच्या ढिगार्‍याखाली गेले होते. रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ताबडतोब घटनास्थळी सर्व प्रशासन यंत्रणा कामाला लावली. तसेच अनेक नेत्यांनी देखील घटनास्थळी जाऊन सुरु असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. या घटनेनंतर मंत्रिमंडळाची जी बैठक बोलवण्यात आली त्यातच इर्शाळवाडीतील रहिवाशांचे सिडकोच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात असल्याची घोषणा करण्यात आली. आता लवकरच इर्शाळवाडीतील रहिवाशांचे एका सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे.