हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून बेड व्हेंटिलेटर आणि रेडमीसिविरचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. त्यावर डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, केंद्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले.
Spoke to #Maharashtra CM Sh Uddhav Thackeray Ji
Reassured @OfficeofUT of adequate & uninterrupted supply of medical oxygen & all possible support w.r.t healthcare infra, medicines & therapeuticsAdditional 1,121 ventilators are also being rushed to them given the surge in cases.
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 17, 2021
चर्चेत राज्यातील ऑक्सिजनच्या तुडवड्याबाबत दोघांमध्ये बातचीत झाली. या संकटाचा सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, योग्य वर्तन आणि लसीकरण या पाच स्तंभांवर लक्ष केंद्रीत करण्याचा पुनरुच्चार केल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. सर्वौत्तोपरी महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आश्वासन दिले आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.