आरोपींना कडक शिक्षा होणार, तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा; मुख्यमंत्र्यांची कल्पिता पिंपळेंना ग्वाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माथेफिरू फेरीलवाल्याच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे  यांची आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून विचारपूस केली. आरोपीला कडक शिक्षा होईल, आपण काळजी करू नका, तुम्ही फक्त लवकरच ठणठणीत बऱ्या व्हा..असा शब्द उद्धव ठाकरेंनी कल्पिता पिंपळे यांना दिला.

महापौर नरेश म्हस्के यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महापौर म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांचं कल्पिता पिंपळेंशी बोलणं करून दिलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याने काही वेळ कल्पिता पिंपळे देखील गहिवरल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून माझी विचारपूस केली. त्यांनी मला जो धीर दिला आहे त्यामुळे मला एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात बळ आले आहे. त्यामुळे बरे वाटले, असं कल्पिता पिंपळे म्हणाल्या.

नक्की काय आहे प्रकरण-

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने सोमवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फेरीवाल्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.