दिवाळीत स्वत:हून फटाके वाजवणं टाळा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच जनतेला आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (8 नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व समाजबांधवांनी सण घरात राहून साजरे केले. त्याबद्दल सर्वांचे आभार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.दिवे जरुर पेटवा, फटाके न वाजवा तर उत्तम, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दिवाळीत फटाके फोडण्याबाबत काय निर्णय़ घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मी बंदी वगैरे घालणार नाही. मात्र शक्यतो दिवाळीत फटाके फोडू नका. प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांत जे कमावलंय ते चार दिवसांच्या धुरात वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. या माध्यमातून ते नागरिकांना सातत्याने राज्यातील कोरोनाची परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती देत होते. अनेक लोकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुकही करण्यात आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment