‘उद्धवजी अतिवृष्टी झालेल्या भागांचा किमान प्रत्यक्ष दौरा करा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाआहे. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून येथील लोकांना दिलासा मिळेल. तसेच आपातकालीन व्यवस्थापनासोबत तातडीने बैठक घेऊन काय मदत करणार, हेदेखील जाहीर करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. CM (Uddhav Thackeray should visit heavy rain places in Maharashtra) कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर न पडत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जाते. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांच्या या मागणीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

दरम्यान, परतीच्या पावसामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे 18 आणि 19 ऑक्टोबरला मराठवाड्याचा दौरा करतील. या दोन दिवसीय दौऱ्यात शरद पवार तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment