पंतप्रधान मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावर उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा ट्विट करत म्हटलं होतं की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो”. उद्धव ठाकरे यांनीदेखील शुभेच्छांबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “नरेंद्र मोदीजी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार. तुमच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र आगामी वर्षांमध्ये देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देईल याचा मला विश्वास आहे”.

कोरोनामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय
यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला असून यासंदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटवरुन माहिती दिली होती. कार्यकर्त्यांना आवाहन करताना, शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानावर गर्दी करु नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. तसंच आपल्या वाढदिवशी आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान, प्लाझ्मा दान शिबीरांचं आयोजन करावं. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ देणगी द्यावी असंही ठाकरे म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment