हॅलो महाराष्ट्र । काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जातील, ट्विटरवरून माहिती दिली होती. त्यानुसार अयोध्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून येत्या ७ मार्चला मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.
संजय राऊत यांनी ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी माहिती देताना सांगितलं “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार याबाबात घोषणा झाली होती. सरकारला १०० दिवस झाल्यानंतर ते जातील असं म्हटलं होतं. परंतु आता ७ मार्चला ते अयोध्येला जातील. या ठिकाणी ते राम लल्लाचं दर्शन घेतील. तसंच शरयू तीरावर आरतीही करतील,” अशी माहिती राऊत यांनी दिली. यावेळी हजारो शिवसैनिकही अयोध्येत जातील, असंही त्यांनी नमूद केलं. “हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याचं कोणीही राजकारण करू नये. राजकीय दृष्टीनं याकडे पाहू नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
मोदी मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करत आहेत – उद्योगपती जॉर्ज सोरोस
तब्बल ५ महिन्यांनंतर जम्मू काश्मीरमध्ये २जी इंटरनेट सेवा सुरू; सोशल मीडियावर अजूनही बंदी
फेसबुकच्या मार्केटिंग संचालकपदी अविनाश पंत; भारतीय बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी फेसबुकची नवी रणनीती