मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार; मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री रात्री ८ वाजता हा संवाद साधणार असून तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील कोरोना परिस्थिती, मुंबई लोकल वरील प्रश्नचिन्ह तसेच विध्यार्थ्यांच्या शाळा याबाबत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळत असली तरी दुसरीकडे काही भागात डेल्टा प्लस प्रकाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या कोरोना टास्क फोर्सची बैठक होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय घोषणा करतात हा हे पाहावे लागेल. मुंबई, ठाण्यासह २५ जिल्ह्यांमधील करोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, रुग्णसंख्या जास्त असलेल्या पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड अशा ११ जिल्ह्यांत सध्याचे निर्बंध कायम आहेत.

नव्या नियमावलीनुसार शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु आहेत. रविवारी दुकाने, मॉल बंद राहतील. राज्यात दुकानांच्या वेळा काही ठिकाणी वाढवून दिल्या असल्या तरी हॉटेल आणि रेस्टोरंट मध्ये काही शिथिलता आणून वेळ वाढवण्याची मुभा मुख्यमंत्री देतील का याकडे देखील लक्ष असेल तर ज्यांनी लसीचे २ डॉस घेतलं आहेत त्या मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात येईल का याकडे मुंबईकरांचे लक्ष असेल.

Leave a Comment