हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे येथील एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या 3-4 दिवसांत कळेल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काल मला माजी मंत्री म्हणू नका, असं म्हटलं. माझ्या कानावर असं आलंय की चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत, असं म्हणताना मुख्यमंत्रीही हसले. उपस्थित पत्रकारांनाही मुख्यमंत्र्यांनी हसायला भाग पाडलं.
चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार-
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार अस माझ्या कानावर आलंय म्हणून ते तस बोलले असतील असा टोला संजय राऊतांनी लगावला.