ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, पूरग्रस्त भागाचा दौरा करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळं शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील उपस्थित रहाणार आहेत. नुकसाग्रस्त भागाची पाहाणी केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर करत राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 ऑक्टोबरला राज्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहाणी करणार आहेत. सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री सांताक्रुझ विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण करतील. सोलापूरहून अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खूर्द येथील नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

यानंतर रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. बोरी उमरगे येथील पाहाणी केल्यानंतर मुखमंत्री सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. तसेच अभ्यागताच्या भेटी घेतील. सायंकाळी सोलापूरहून विमानानं मुंबईकडे रवाना होतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा
सकाळी 09:00 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी 09:30 वाजता सोलापूर येथून मोटारीने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे), सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
सकाळी 11:00 वाजता सांगवी पूलाकडे प्रयाण, बोरी नदीची आणि पूरग्रस्त भागाची पाहणी
सकाळी 11:15 वाजता अक्कलकोट शहराकडे प्रयाण, सकाळी 11:30 वाजता अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45 वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण
दुपारी 12:00 वाजता रामपूर येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची आणि शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12:15 वाजता रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण
दुपारी 12:30 वाजता बोरी उमरगे येथे आगमन, आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12:45 वाजता बोरी उमरगे येथून सोलापूरकडे प्रयाण
दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, अभ्यागतांच्या भेटी, नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन आणि मुंबईकडे प्रयाण

(CM Uddhav Thackeray to visit Solapur on Monday, will interact with the farmers affected by the heavy rains)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment