हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प कुटुंबीय भारतात असतील. त्यांच्यासोबत पत्नी मेलोनिया ट्रम्प यासुद्धा भारतात येतील. या दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतात सुरु आहे. व्यापार, सुरक्षा आणि आर्थिक बाबींवर ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.
ट्रम्प दाम्पत्य भेट देणाऱ्या महत्वाच्या दोन ठिकाणी म्हणजेच आग्रा आणि अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी परिसर सुशोभित करण्यात आला आहे. अहमदाबादमधील नियोजित कार्यक्रम आटोपून डोनाल्ड ट्रम्प आग्र्यातील ताजमहाला भेट देणार आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २४ फेब्रुवारी रोजी आग्रा येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करतील. तसेच अमेरिकन राष्ट्रपतीना ताजमहाल भेटीत कंपनी देतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दुस्र्यासाठी आपण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath will welcome US President Donald Trump in Agra on February 24. He will accompany the US President to the Taj Mahal. (File pics) pic.twitter.com/t3ldveRFBv
— ANI UP (@ANINewsUP) February 22, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.