हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतातील लोकांना CNG कारचा आणखी एक पर्याय मिळणार आहे. तुम्हीही सीएनजी कार घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरं तर, पूर्वी लोकांकडे सीएनजी कारसाठी खूप मर्यादित पर्याय होते. येथे CNG कारची मागणी वाढत असल्याने अनेक कंपन्या त्यांच्या कारचे CNG मॉडेल लॉन्च करत आहेत. आता टाटा मोटर्स आपल्या Altroz कारचे CNG मॉडेल भारतात लॉन्च करणार आहेत. टाटा कंपनी आपल्या हॅचबॅक अल्ट्रोजचे CNG व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. मात्र याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
CNG Altroz मध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कारच्या लुक आणि फीचर्समध्ये फारसा बदल झालेला नाही. सीएनजी मॉडेलची किंमत थोडी जास्त असली तरी, बजेटमध्ये आणण्यासाठी सुरुवातीच्या मॉडेलच्या काही वैशिष्ट्यांमध्ये कपात केली जाऊ शकते, परंतु सर्व वैशिष्ट्ये टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखे अनेक फिचर्स या नवीन कारमध्ये देण्यात येतील.
सध्याची Altroz पेट्रोल, डिझेल आणि टर्बो पर्यायांसह उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.29 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10.25 लाख रुपये आहे. पेट्रोल इंजिन Altroz ची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपये आहे.अशा परिस्थितीत कंपनी एकापेक्षा जास्त व्हेरियंटमध्ये सीएनजी ऑफर करेल अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वाढू शकते.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय