ऊस उत्पादकांना सामोरे न जाता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पळ काढला : बी. जी. पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आम्ही काल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेवून रॅली काढून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आलो होतो. आमची मागणी रास्त व कायद्याने होती. 14 दिवसात एफआरपीची मिळावी, तसेच जो नफा राहतो त्याच्यामध्ये दोन हप्त्यात रक्कम मिळावे. मात्र, दुर्देवाने कालचा दिवस लोकशाहीतील काळाकुट्ट दिवस म्हणावा लागेल, लोकशाही मार्गाने ऊस उत्पादक मागणी करत होते. त्या मागणीला सामोरे न जाता बाळासाहेब पाटील यांनी पळ काढला. जी नैतिकता व गोपनीयतीचे शपथ घेतली होती, त्या पदाला शोभणारे झाले नाही. तेव्हा अजून वेळ गेलेली नाही, त्यांना चर्चा व समन्वयांचे दरवाजे खुले आहेत. अन्यथा आपण कायद्याची मोडतोड करत असाल तर आपणांस पदावरून खाली खेचावे लागेल असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी दिला आहे.

कराड येथे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी जाणारी संघर्ष यात्रा पोलिसांनी दत्त चाैक येथे रोखली. त्यानंतर बळीराजा शेतकरी संघटनेने कराड येथील प्रशासकीय इमारत (तहसिल कार्यालय) समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी बी. जी. पाटील पत्रकारांनी बोलत होते. यावेळी केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, साजिद मुल्ला यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. आंदोलनस्थळी खर्डा- भाकरी खाऊन आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

पंजाबराव पाटील म्हणाले, जो पर्यंत एक रकमी FRP व वाढीव सहाशे रुपये असे 3600 रूपये दर मिळत नाही. तोपर्यंत कराडमध्ये धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगत सर्व मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत उस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसतोड बंद करावी. सहकारमंत्र्यांच्या घराकडे जाणारी संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखल्यानंतर बळीराजा शेतकरी संघटनेने कराड तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरु ठेवले आहे.

You might also like