टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व अबाधित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली. यामध्ये एकूण 13 जागा होत्या. यामध्ये पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर सर्वसाधारण मतदारसंघाच्या आठ जागेसाठी नऊ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. या उपसा जलसिंचन योजनेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व अबाधित राहिले आहे.

रविवार दि. 4 डिसेंबर रोजी टेंभू येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये हणमंत नामदेव कदम 232 मते, लालासो नानासो डुबल 253 मते, जयवंत किसन पाटील 267 मते, दिलीप रामचंद्र पाटील 230 मते, सुरेश प्रल्हाद पाटील 266 मते, भिमराव विष्णू माने 240 मते, मानसिंग बाबुराव सावंत 266 मते, मिलींद मारूती सुर्वे 247 मते मिळवून हे उमेदवार विजयी झाले. तर हणमंत निवृत्ती पाटील यांना 73 मते मिळाल्याने त्यांचा पराजय झाला. तर 7 मते बाद झाली. तर महिला राखीव मतदारसंघातून सुमन मोहनराव पाटील, शारदा जगन्नाथ बाबर, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून यशवंत विष्णू मोहने, इतर मागासवर्ग मतदारसंघातून जयप्रकाश जोती गुरव, विमुक्त जाती भटक्य जमाती विशेष मागास प्रवर्गातून मोहन दत्तू लेंगरे हे बिनविरोध निवडूण आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. आर. मोरे यांनी काम पाहिले.

यावेळी सर्व विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक विलास भंडारे, टेंभू-सयापूर विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बब्रुवान पाटील, दत्तात्रय चरेगावकर, राजेंद्र पाटील, टेंभूचे माजी उपसरपंच तात्यासो लेंगरे, प्रताप सावंत, शिवलिंग जंगम, माणिक ठोंबरे, विनायक कदम, टेंभू ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय कुंभार, सुभाष शिंदे, रमेश जाधव, बाळासो पाटील, आनंदा वाघमारे, पिंटू घोरपडे, नंदकुमार डुबल, बाबरमाची ग्रामपंचायत सदस्य अधिक पाटील, सयाजी देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व विजयी उमेदवारांचे कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे विश्‍वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले.