पुणे बंगलोर महामार्गावर परदेशी तरुणाकडे सापडले 16 लाखांचे कोकेन; खासगी ट्रॅव्हल्समध्ये झडती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणार्‍या एका नायजेरियन तरुणाकडे तब्बल १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे कोकेन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोकेन हे अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या नायजेरियन तरुण एडवर्ड जोसेफ इदेह याला इस्लामपूर पोलीसांनी अटक केली आहे.

पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयीत कोकेन अंमली पदार्थ घेवून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यांनतर पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.

सांगली जिल्ह्यातील पेठनाका येथे इस्लामपूर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याकडे १६४ ग्रॅमच्या कोकेन कॅप्सुल मिळून आले. न्यायालयाने त्याला १ जानेवारी पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

दि.२५ नोव्हेंबर रोजी वाघवाडी फाटा येथे बसने मुंबई ते बेंगलोर प्रवास करीत ११ लाख रुपयांचे कोकेन घेवून जाणाऱ्या टांझानियाच्या तरुणास पोलीसांनी जेरबंद केले होते. त्याच्याकडे १०९ ग्रॅम कोकेन मिळाले होते. दरम्यान एका महिन्याच्या अंतरात हा दुसरा परदेशी तरुण कोकेन घेवून जाताना पोलीसांच्या जाळ्यात सापडला आहे.

Leave a Comment