रेल्वेच्या जेवणात सापडलं जिवंत झुरळ; Video पाहून व्हाल हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासासाठी सर्वात उत्तम साधन मानलं जात. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आणि लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी अशी रेल्वेची ओळख असल्याने दररोज करोडो भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करत असते. मात्र एका प्रवाशाने आयआरसीटीसीद्वारे ऑर्डर केलेल्या जेवणात झुरळ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रवाशाने सोशल मीडियावर या झुरळाचा विडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, Aggravating-Wrap-266 नावाचा एका प्रवाशाने रेल्वे प्रवासादरम्यान आयआरसीटीसीकडून जेवण ऑर्डर केले. या जेवणात भात, वरण, चपाती, २ भाज्या आणि गुलाबजामचा समावेश होता, मात्र या गुलाबजाम वर जिवंत झुरळ होते, जे इकडेतिकडे फिरत होते. यानंतर संतप्त प्रवाशाने या झुरळांचा विडिओ काढून reddit वर शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली.

Cockroach in food
byu/Aggravating-Wrap-266 inindianrailways

सोशल मीडियावर हा विडिओ अगदी वाऱ्यासारखा व्हायरल झाला . यंत्र त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एक यूजर्स म्हणाला, म्हणूनच मी रेल्वे किंवा स्टेशनवर शिजवलेले काहीही खात नाही. एकतर मी माझे स्वतःचे अन्न घेतो किंवा फक्त पॅकेज केलेले स्नॅक्स घेतो. माझ्याकडे काही नसेल तर मी दिवसभर उपाशी राहीन. तर दुसरा एक यूजर म्हणाला, “म्हणूनच मी नेहमी प्रत्येकाला सल्ला देतो की तुम्ही प्रवास करत असलेल्या एसी टियरची पर्वा न करता स्वतःचे जेवण आणा. आणखी एक जण म्हणतो, IRCTC वर कधीही ऑर्डर देऊ नका त्याऐवजी उपाशी पोटी झोपा पण ऑर्डर कधीही करू नका. घरी शिजवलेले अन्न सर्वोत्तम आहे. परंतु या एकूण प्रकारामुळे रेल्वे विभागाची पुन्हा एकदा नाचक्की झाली हे मात्र नक्की…