अहमदनगर प्रतिनिधी । जिल्ह्यात असणाऱ्या कोपरगाव तालुक्यात एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा संजय अरगडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. या तरुणीनं नेमकी का आत्महत्या केली. हे अजून स्पष्ट झालं नाही.
स्काॅलरशिपचा फाॅर्म चुकीचा भरल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. मात्र या तरुणीनं नेमकी का आत्महत्या केली हे कारण अजून अस्पष्ट आहे. हि तरुणी कोपरगावला आयटिआयच्या तृतीय वर्षात शिकत होती. तीने आपल्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. हि माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी तिला फासावरून खाली उतरवले.
या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आणि या विद्यार्थिनींला रुग्णालयात पाठवलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिला मृत घोषित केलं. त्यानंतर तीच प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलं आहे. या घटनेचे नेमके कारण काय ? ते अजून समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.