Collard Vegetable : ब्लड शुगर कंट्रोल करायची आहे? तर आहारात ‘या’ भाजीचा समावेश करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Collard Vegetable) भारतात मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे. मधुमेहींना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत फार काळजी घ्यावी लागते. तसेच बराच वेळ उपाशी राहणे किंवा सतत खाणे अशा सवयी देखील टाळाव्या लागतात. एकंदरच काय तर मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत अत्यंत जागरूक रहावे लागते. आपल्याला आहारात काय खायचे आहे? हे डॉक्टरला विचारल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही. कारण, ज्या पदार्थाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढेल अशा अन्नपदार्थांपासून मधुमेहींना लांब राहावे लागतो.

बऱ्याचदा खाण्यापिण्यात अचानक बदल झाला तर मधुमेहींना त्रास होण्याची शक्यता असते. तज्ञ सांगतात की, मधुमेहींच्या आहारात हिरव्या भाज्या असणे अत्यंत गरजेचे आहे. (Collard Vegetable) मेथी, पालक आणि कोथिंबीर अशा देशी तसेच केल आणि कोलार्डसारख्या विदेशी हिरव्या भाज्यासुद्धा मधुमेहींच्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. आज आपण यांपैकी एका विदेशी भाजीविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. ती भाजी म्हणजे कोलार्ड. चला तर जाणून घेऊया हिरव्या भाज्यांपैकी एक कोलार्ड भाजीचे फायदे.

कोलार्ड पालेभाजी (Collard Vegetable)

मधुमेहींच्या आरोग्यासाठी निश्चितच हिरव्या पालेभाज्या चांगल्या आणि महत्वाच्या असतात. त्यात कोलार्ड या विदेशी भाजीचादेखील समावेश आहे. आजकाल कोणत्याही सुपरमार्केटमध्ये ही भाजी सहज उपलब्ध होताना दिसते. ही भाजी मधुमेहींसाठी फार फायदेशीर मानली जाते. कारण या भाजीमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात. तसेच यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे कोलार्ड या हिरव्या भाजीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी थेट वाढत नाही. याचा फायदा मधुमेहाच्या रुग्णांना होतो.

आरोग्यदायी कोलार्ड

मुळात, हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. (Collard Vegetable) त्यामुळे मधुमेहींच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश महत्वाचा मानला जातो. त्यात खास करून कोलार्ड भाजीचे सेवन केल्याने हाडांची आणि दातांची ताकद वाढते. तसेच या भाजीमध्ये व्हिटॅमिन के चांगल्या प्रमाणात असते. ज्याच्या सहाय्याने मेंदू, हाडे आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना विशेष लाभ होतो.

कॅन्सरचा धोका टळतो

कोलार्डमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे या भाजीचे सेवन केल्यास रोग प्रतिकारक शक्ती चांगली वाढते आणि मजबूत होते. (Collard Vegetable) परिणामी कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो, असा दावा काही अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे.