औरंगाबाद: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता आणि मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी अंशतः लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी स्वतः शहरांमध्ये फिरून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिक,दुकांदारावर कारवाई केली. जिल्हाधिकारिसह दोन्ही आयुक्त रस्त्यावर उतरल्याने नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले.
राज्या पाठोपाठ शहरांमध्ये देखील कोरोना डोकंवर काढतोय, कोरोनाच संकट हे दिवसेंदिवस वाढतच चालल आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले असून काल रात्री बारा वाजेपासून अंशतः लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली होती , परंतु जे दुकानदार स्वतः मास्क लावत नाहीत, त्यांच्याकडे थर्मामीटर नाहीत,ज्यांनी कोरोना टेस्ट सुद्धा केली नाही आणि दुकानांमध्ये सर्रास गर्दी होऊ देतात अशा दुकानदारांवर स्वतः मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त,आणि जिल्हाधिकारी यांनी शहरांमध्ये फिरुन कारवाई केली.आज पहिलाच दिवस आहे म्हणून दंडात्मक कारवाई करून सोडून देतोय परंतु असेच नियम पायदळी घालाल तर उद्यापासून कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराच त्यांनी दिल्याचे पाहायला मिळाले.
नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहे. यामुळे अंशतः लॉक डाऊन सुरू करण्यात आला. आज गुरुवारी पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय व मी संयुक्त पाहणी केली. यावेळी नियम मोडणाऱ्यांना दंड करून सोडले परंतु पुढे नियमाचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा