कोरोनातून बरे झाल्यावर लोकांमध्ये जनजागृती निर्माण करा’ ; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे कोरोनाबाधित रूग्णांना आवाहन

औरंगाबाद : कोरोना लढाईत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुमची संपूर्ण काळजी घेतली जाईल. तुम्ही लवकर बरे व्हा, बरे झाल्यावर लोकांमध्ये कोरोना आजार होऊ नये या संदर्भात घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करा, असे आवाहन पैठण येथील कोरोनाबाधित रूग्णांना त्यांच्याशी संवाद साधताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी केले. पैठण येथील समाजकल्याण मुलींच्या वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमधील … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

corona

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 1458 जणांना (मनपा 1086, ग्रामीण 372) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 71340 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88489 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1788 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या … Read more

आजपासून सुरू होणारी लसीकरणाची मेगा मोहीम संकटात

corona vaccine

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा या उद्देशाने शासनाने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. शहरात दररोज २ हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. महापालिकेकडे केवळ ४ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आज १ एप्रिलपासून सुरू होणारी लसीकरणाची मेगा मोहीम संकटात सापडली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, या उद्देशाने शासनाकडून महापालिकेला लसीचा पुरवठा केला जात … Read more

अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयांतील खाटांबरोबर कार्यरत मनुष्यबळही अपुरे पडत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. एकट्या घाटीत तज्ज्ञ डाॅक्टरांसह ५५२ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे, तर ग्रामीण भागासाठी ८७ डाॅक्टर्स, परिचारिकांची आवश्यकता आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर कोरोना रुग्णसेवा देण्याची कसरत करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर ओढावत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट सुरूच; तब्बल 1542 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

aurangabad corona

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी 1220 जणांना (मनपा 900, ग्रामीण 320) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 65438 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल बुधवारी एकूण 1542 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 82679 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1670 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15571 रुग्णांवर उपचार सुरू आहे. शहर रुग्ण संख्या (1090) … Read more

औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

corona

औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्यामुळे दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. संपूर्ण कुटुंबाला संसर्ग झाल्यामुळे अनेक गावांत चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने कोवीड केअर सेंटरद्वारे ग्रामीण भागात आठ हजार ८३२ बेड उपलब्ध केले आहेत. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांच्यावर घाटीत उपचार करण्यात येत आहेत. शहरात दाट लोकसंख्या असल्यामुळे कोरोना समूह … Read more

…तर लॉकडाऊनचा उपयोग काय ?; अतुल सावे यांनी उपस्थित केला सवाल

औरंगाबाद : लॉकडाऊन हे सोल्युशन नाही. कधीच नव्हते आणि नसेलही. प्रशासनाने नियमांचे पालन करण्यासाठी मोठी फौज रस्त्यावर उतरवायला हवी होती. लॉकडाऊन हा पर्यायच असू शकत नाही, अशी टीका औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केली. लॉकडाऊन मध्येही नागरिक रस्त्यावर आहेत, मग या लॉकडाऊनचा उपयोग काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दररोज शहरात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या … Read more

स्वतःहूनआलेल्यांचीच चाचणी ; हर्सूल एन्ट्री पॉइंटवरील प्रकार

aurangabad corona test

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मनपा प्रशासनाच्या वतीने बाहेर गावाहून शहरात येणार्‍या नागरिकांची ६ एन्ट्री पॉईंटवर चाचणी केली जात आहे. परंतु या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही न थांबवता जे स्वतः आलेत त्यांचीच चाचणी केली जात असल्याचा प्रकार हर्सूल येथे समोर आला आहे. शहरात कोरोनाचा कहर वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्याकरिता प्रशासनाने विविध … Read more

औरंगाबाद शहर लाॅकडाऊनच्या दिशेने; जिल्हाधिकारी घेणार टास्क फोर्सची बैठक

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका प्रशासक यांच्या टास्क फोर्सची बैठक होऊन येत्या काही तासांत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार असून, त्यातून उद्योगांना वगळले जाणार आहे. मार्च महिन्यात कोरोनाबाधितांच्या … Read more

5 एप्रिलपासून महापालिकेची मेगा लसीकरण मोहीम

औरंगाबाद : शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता 5 एप्रिलपासून मेगा कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. या मोहिमेसाठी शंभर पथके नियुक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दहा ते पंधरा दिवसांत तीन लाख शहरवासीयांचे लसीकरण करण्याचे टार्गेट प्रशासनाने समोर ठेवले आहे. शहरात मागील … Read more