सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महिला आर्थिक विकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 ते 26 मार्च 2023 या कालावधीत महिला बचत गट उत्पादित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषद मैदान येथे आयोजन करण्यात आलेलया प्रदर्शनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
यावेळी रुचेश जयवंशी म्हणाले की, या प्रदर्शनात 135 बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये विविध प्रकारचे मसाले, चटण्या, पापड, पीठे, कडधान्ये, लोणचे, सांडगे, कुरडई, शेवई, सेंद्रीय गूळ, चकली, नानकेट, बिस्कीटे, पिशव्या, पर्स, मातीची भांडी, लाकडी कलाकुसर, लोकरीच्या वस्तू, फ्रेम्स, इंद्रायणी तांदूळ, इमिटेशन ज्वेलरी यासह विविध वस्तुंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
बचत गट उत्पादित वस्तूंचे 24 ते 26 रोजी प्रदर्शनाचा लाभ घ्या; जिल्हाधिकारी जयवंशीचे आवाहन pic.twitter.com/7UQrHxebIS
— santosh gurav (@santosh29590931) March 21, 2023
जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन व विक्री दि. 24 ते 26 मार्च 2023 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत सुरु राहणार आहे. तसेच रोज सायंकाळी विविध मनोरंजन व प्रबोधनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.