औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाळूज येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनासंदर्भात अधिक दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, दंड अधिकारी वैजापूर, सर्कल आॅफिसर, तलाठी, आरोग्य कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
कोरोनासंदर्भात दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले. तसेच याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहनही केले. वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाºयांना सूचना केल्या.
यावेळी बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे मास्कबद्दल अजून जागरूकता झाली पाहिजे, व्हॅक्सीनेशनसाठी मोठ्या प्रमाणात सुरूवात करा, ज्या घरात कोरोना रुग्ण आढळला. त्या घरातील नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करा, इतर गावकºयांची कोरोना चाचणी करा, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराबाहेर पाटी लावा, स्टिकर लावा, सर्व कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाची थाळी प्लास्टिक कव्हरने झाकून ठेवावी, जेणेकरून जेवणातील गुणवत्ता टिकून ठेवण्यात मदत होईल, दोन स्मार्ट सिटी बस आणि दोन अॅम्ब्युलन्स लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group