काॅलेज युवतीचे भरदिवसा अपहरण : पुणे- बंगळूर महामार्गावर पिडीत तरूणी दुचाकीवरून पडल्याने जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा शहरातील एका काॅलेजच्या परिसरात 20 वर्षीय युवतीचे चक्क दुचाकीवरून अपहरण केल्याची घटना समोर आले आहे. संशयित बहाद्दराने भरदिवसा अपहरण केले होते. ‘तू आताच माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणारच नाही,’ अशी धमकीही दिली. संशयिताने पीडित तरुणीला पुणे -बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर घेवून गेला होता. तेव्हा डी मार्ट परिसरात धावत्या दुचाकीवरून तरूणी खाली पडल्याने जखमी झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात तरूणीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रतीक संतोष गायकवाड (रा. फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घटनेच्या दिवशी 6 जानेवारी रोजी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास धनंजय गाडगीळ कॉलेजसमोर उभी होती. दरम्यान याठिकाणी प्रतीक गायकवाड हा आपल्या दुचाकीवरुन तेथे आला. त्याने युवतीला जबरदस्ती करत आपल्या दुचाकीवर बसवलं. यानंतर त्याने युवतीला ‘तू आताच माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला सोडणारच नाही,’ अशी धमकी दिली.

प्रतीक गायकवाड याने पीडित तरुणीला दुचाकीवर बसवून पोवई नाका, वाढेफाटा मार्गे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डी मार्टसमोर आणलं. याठिकाणी पीडित तरुणीनं दुचाकीवरून पाय टेकवत खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण दुचाकी तशीच पुढे गेल्याने ती खाली पडली. या अपघातात तिच्या हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Leave a Comment