दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचे नवीन रुग्ण पन्नासच्या आत

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोनाची लाट शहरातून ग्रामीण भागातही पसरली होती. त्यामुळे कोरोनाची भीती संपूर्ण शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा होती. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहीम सुरु केली होती. आणि कडक निर्बंध लावले होते. आता हळू-हळू कोरोना कमी होत असतानाच पुन्हा ही रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सोमवारी एकूण 45 कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले आहेत. यामध्ये शहरातील 12 आणि ग्रामीण भागातील 33 रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 27 झाली असून सोमवार पर्यंत एकूण 3 हजार 422 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 109 रुग्णांना सुटी मिळाली आहे. यामध्ये शहरातील 19 आणि ग्रामीण भागातील 90 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान सोमवारी 1 लाख 41 हजार 898 रुग्णांना सुटी मिळाली असून सध्या एकूण 707 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बुधवार रोजी शहरात 8 आणि ग्रामीण भागात 51 रुग्ण आढळून आले होते. कोरोनाची रुग्ण संख्या अत्यंत कमी झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त होईल असे वाटत होते. परंतु गुरुवारी पुन्हा 59 वरून ही संख्या 115 वर पोहोचली होती. त्याचबरोबर गुरुवारी शहरात 26 तर ग्रामीण भागात 89 रुग्ण आढळून आले होते. घाटी रुग्णालयातील कोल्ही (ता. वैजापूर) येथील महिला (70), खूलताबाद येथील पूरूष (85), पांजरगाव (ता.वैजापूर) येथील पूरूष (50), कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर जिल्हा सामान्य रूग्णालयात बोरगाव (ता. खुलताबाद) येथील पूरूष (70) व खासगी रुग्णालयात खंडोबा मंदीर परिसर येथील पूरूष (41) या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.