दिलासादायक! महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या अँटीजन चाचण्यामध्ये फक्त तीन रुग्ण कोरोनाबाधित

Antigen test
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण आणि कोविड चाचण्या केल्या जात आहेत.

सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अँटीजन चाचणी केली असता फक्त तीन रुग्ण आढळले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोविड सेंटर मध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी या चाचण्या केल्या होत्या. महापालिकेच्या कोविड सेंटर मध्ये 22 अँटीजन चाचण्या करण्यात आल्या. यावेळी एकही रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह निघाला नाही. त्याचबरोबर शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये मोबाईल टीमने 1,418 अँटीजन चाचण्या केल्या असून आरटी-पीसीआर चाचण्यांसाठी 400 संशयितांचे स्वॅब नमुने गोळा केले.

सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 07 आणि खाजगी प्रयोगशाळांद्वारे 78 आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यावेळी, जीएमसीएच (डेंटल) ने 53 अँटीजन चाचण्या घेतल्या आणि खाजगी प्रयोगशाळांनी 35 अँटीजन चाचण्या केल्या असता कोणताही पॉसिटीव्ह रुग्ण आढळला नाही. AMC लवकरच सर्व RT-PCR चाचण्यांचा अहवाल प्राप्त करणार आहे.