औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. सरकारी कार्यालय, एन्ट्री पॉईंट, रेल्वेस्टेशन, विमानतळ या ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या केल्या असता निगेटिव्ह आल्या आहेत.
सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सहा एंट्री पॉइंट, 9 सरकारी कार्यालय या ठिकाणी 914 अँटीजण चाचण्या करण्यात आल्या त्याच बरोबर विमानतळ रेल्वे स्टेशन या ठिकाणी 80 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. परंतु यातून कोणीही पॉझिटिव्ह आले नाही.
चिकलठाणा याठिकाणी 116,हर्सूल टी पॉइंट 109, कांचनवाडी 254, झाल्टा फाटा 144, नगर नाका 73,दौलताबाद टी पॉइंट 67,या सहा एन्ट्री पॉईंटवर चाचण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर महापालिका मुख्यालय 9, पोलीस आयुक्त कार्यालय 35, उच्च न्यायालय 15,जिल्हाधिकारी कार्यालय 27, विभागीय आयुक्त कार्यालय 2, आरटीओ कार्यालय 20,जिल्हा न्यायालय 13, कामगार उपायुक्त कार्यालय 10,कामगार कल्याण कार्यालय 20,या 9 सरकारी कार्यालयात 914 चाचण्या करण्यात आल्या आहे. आणि रेल्वेस्टेशन 50,विमानतळ 30 चाचण्या करण्यात आल्या.