दिलासादायक ! मंगळवारी अँटीजन चाचणीतून शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

Antigen test
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारी ने संपूर्ण राज्यभर थैमान घातले होते. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता कोरोना संसर्गाची दुसरीला जवळपास ओसरली आहे. यामुळे अँटीजन चाचणीतून एकही रुग्ण पॉझिटिव येत नसल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी महापालिका केंद्रांवर दिवसभरात केलेल्या चाचण्यांत फक्त 8 जण पॉझिटिव्ह आले. आणि सहा एंट्री पॉइंट, सरकारी कार्यालयांमध्ये 1004 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. शासनाने एक एका पॉझिटिव्ह रुग्ण मागे 30 ते 40 चाचण्या करण्याची सूचना दिली आहे. परंतु शहरात दिवसभरात एक ते दीड तास चाचण्या केल्या जातात. कोरोना संसर्गाचा धोका वाढला तेव्हा महानगरपालिकेने शहरातील प्रमुख सहकारी कार्यालय, सहा एंट्री पॉइंटवर प्रवाशांच्या चाचण्या केल्या होत्या. आणि अजूनही या चाचण्या सुरू आहेत.

कार्यालयांमध्ये महापालिका मुख्यालय 10,पोलीस आयुक्तालय 46,उच्च न्यायालय 12, जिल्हाधिकारी कार्यालय 30, विभागीय आयुक्त कार्यालय 19,आरटीओ कार्यालय 16,जिल्हा न्यायालय 24,कामगार उपआयुक्त कार्यालय 14,कामगार कल्याण कार्यालय 12 त्याचबरोबर एन्ट्री पॉईंटच्या ठिकाणी चिकलठाणा 207,हर्सूल टी पॉईंट 66, कांचनवाडी 120,झाल्टा फाटा 162,नगर नाका 41,दौलताबाद टी पॉइंट 225 आदी चाचण्या करण्यात आल्या.