दिलासादायक! महिनाभर लसींची चिंता मिटली

औरंगाबाद | कोरोना महामारीचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. कोरोना लसीकरणासाठी शहरातील आरोग्य केंद्रावर नागरिक गर्दी करत आहेत. परंतु शासनाकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याने पहिल्या आणि दुसऱ्या डोस साठी वाट बघावी लागत आहे. सतत जाणवत असलेल्या लसींचा तुटवडा आता महिनाभर तरी भासणार नाही. कारण बजाज कंपनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर अंतर्गत 23 लाख 30 हजार डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून दर आठवड्याला 20 ते 25 हजार लसी मिळणार आहेत.

शहरात महापालिकेचे लसीकरणाचे उद्दीष्ट हे 11 लाख 76 हजार 999 एवढी असून 6 लाख 76 हजार 44 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दुसरा डोस घेणार्‍यांचे प्रमाण हे तारखेच्या फक्त 16.99 टक्के एवढे आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही केवळ 1 लाख 99 हजार 997 एवढी आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात लसीकरणाची टक्केवारी जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाचे प्रमाण 21 लाख 10 हजार 815 एवढे आहे. ग्रामीण मध्ये 24.5 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस चे प्रमाण हे 7.56% आहे. ग्रामीण भागामध्ये एक लाख 59 हजार 681 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यातील लसीकरणाचे लक्ष हे 32 लाख 87 हजार 84 एवढे निश्चित झाले असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 70 टक्के नागरिकांची लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु शासनाकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्यामुळे अडचण येत आहे. आठवड्यातून चार ते पाच दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येते. बजाज समूहाने सीएसआर च्या माध्यमातून शहराला आणि ग्रामीण भागाला सारखाच 1 लाख 15 हजार डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like