छ. संभाजी महाराजांचे आजोळी भव्य – दिव्य स्मारक उभारण्यास सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ फलटण आहे. त्यामुळे शहरात महाराजांचा स्मारक असावे, अशी खूप दिवसांची भावना फलटणकर जनतेची होती. श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या आदेशानुसार फलटण शहरात भव्य- दिव्य स्मारक उभे करण्यात येत आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचा खर्च स्वतः रामराजे नाईक- निंबाळकर करणार असल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी दिल्या. फलटण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या प्रांगणामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचे भूमिपूजन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. भूमिपूजन प्रसंगी फलटण तालुक्यातील व शहरातील शिव प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा शिवप्रेमींनी दिल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट, नगरसेवक अजय माळवे, सनी अहिवळे, किशोर नाईक- निंबाळकर, बाळासाहेब मेटकरी, दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, अमरसिंह खानविलकर, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद निंबाळकर, सद्गुरू पतसंस्थचे चेअरमन तेजसिंह भोसले, माऊली सावंत, रणजित निंबाळकर, संजय पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.