हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात 2 वेळा घरगुती गॅसच्या किमती वाढल्या होत्या. यानंतर विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमती 644 रुपयांवरून वाढून 694 रुपये प्रति सिलेंडर झाल्या होत्या. आता विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली नसून कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.
गेल्या एका महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91 रुपयांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात कमर्शिल गॅस उपभोक्त्याना सिलेंडर 1290 रुपये किंमतीला मिळत होता, डिसेंबरमध्ये हे दर 91 रुपयांनी वाढून 1381.50 रुपये झाले आहेत.
देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी आयओस च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या किंमतीनुसार दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 17 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर 1332 रुपयांचा सिलेंडर 1340 रुपये झाला आहे. मुबंई आणि चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती अनुक्रमे 1297.50 रुपये आणि 1463.50 रुपये आहे. या दोन्ही शहरात 17 रुपयांची वाढ झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’