महागाईचा भडका; कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढत असताना याऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल 43.5 रुपयांची मोठी वाढ केली आहे. किंमतीतील या वाढीनंतर, आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक प्रति सिलेंडरची किंमत आता १७३६.५० रुपये इतकी झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होतील

आता दिल्लीत 19 किलो कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपये इतका झाला आहे. आधी याच सिलेंडरची किंमत 1693 रुपये होती. कोलकातामध्ये 19 किलो कमर्शियल सिलेंडरची किंमत 1805.5 रुपये झाली आहे. आधी ही किंमत 1770.5 रुपये होती.

गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती ७५ रुपयांनी वाढल्या होत्या. त्याआधी ऑगस्टमध्येही किंमती दुप्पटीने वाढल्या होत्या. खरं पाहायला गेलं तर, इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०२१ मध्ये आतापर्यंत एकूण ४०४.५० रुपयांची वाढ झाली आहे.