Wednesday, March 29, 2023

भारत स्टेज ३ च्या उंबरठ्यावर; कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देश आणि महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात काही प्रमाणात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळं आता प्रत्येक नागरिकाने जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. कोरोनाच्या धोका वाढला असून सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचा पालन करण्याची गरज आहे. असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना केलं आहे.

भारत कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. लॉकडाऊनचे नियम तोडल्यास कोरोनाच्या संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. वयस्कर नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. जर कोणालाही कोरोनाची लक्षण किंवा कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची माहिती लपवू नका त्वरित प्रशासनाला कळवा. असं आवाहनही आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतात कमी कोरोनाची कमी लागण झाल्याची बाब सुद्धा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नमूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

समूह संसर्ग म्हणजे काय?
समुह संसर्ग म्हणजे, एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. त्या व्यक्तीला कोणामुळे, कुठे आणि कशी लागण झाली याबाबतचा शोध घेणं जेव्हा कठीण होतं तेव्हा देशात किंवा राज्यात समुह संसर्गाला सुरूवात झाली असे समजावे. समुह संसर्ग सुरू होण्यापूर्वी, सुरूवातीच्या काळात विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला कशामुळे किंवा कोणामुळे संसर्ग झाला हे समजते. पण एखादा व्हायरस अथावा रोगाचा सुरूवातीच्या काळात प्रसार किंवा संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असते. कारण सुरूवातीच्या काळात याची लक्षणे दिसून येत नाही. तोपर्यंत एखादा संसर्ग झालेला व्यक्ती हजोरांना या रोगाची लागण करू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

Breaking | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

 

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन