Diwali Sale : मारुती, महिंद्रा आणि टाटा सारख्या कंपन्या ‘या’ गाड्यांवर देत आहे बंपर सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दिवाळी (Diwali Sale) हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणाच्या वेळी लोक नवनवीन गोष्टी खरेदी करण्याचा विचार करत असतात. दिवाळी सुरु (Diwali Sale) होयच्या अगोदर काही कंपन्या बंपर सेल लावत असतात. यामध्ये त्या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष सूट देत असतात. यंदाच्या दिवाळीला तुम्ही जर आपल्या स्वप्नातील ड्रीम कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती, महिंद्रा आणि टाटा यांसारख्या मोठ्या कंपन्यानी आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर दिली आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कारवर किती मिळत आहे सूट

मारुतीच्या वाहनांवरील सवलत
Ciaz : सियाझच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारांवर रु.३०,००० पर्यंत सूट देण्यात येत आहे.
इग्निस: इग्निसच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर 10,000 रुपये आणि ऑटोमॅटिकवर 20,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
S Presso: S Presso च्या मॅन्युअल वेरिएंटवर Rs 56,000 पर्यंत बंपर सूट आहे.
डिझायर: डिझायरच्या AMT व्हेरियंटवर 52,000 रुपयांपर्यंत आणि मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटवर 17,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
Alto K10: नवीन Alto K10 च्या AMT आणि मॅन्युअल दोन्ही आवृत्त्यांवर एकूण 39,500 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
Celerio: Celerio च्या मॅन्युअल एडिशनवर एकूण 51,000 रुपयांची सूट आहे. त्याच वेळी, AMT मॉडेलवर 41,000 रुपयांची सूट आहे. सीएनजी मॉडेलवर 10,000 रुपयांची सूट आहे.
स्विफ्ट: स्विफ्टच्या AMT प्रकारावर 47,000 रुपयांपर्यंत आणि मॅन्युअल प्रकारावर 30,000 रुपयांपर्यंत सूट आहे.

टाटाच्या वाहनांवरील सवलत
Altroz: कंपनी Tata Altroz ​​वर 20,000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस अंतर्गत रु. 10,000 समाविष्ट आहेत.
हॅरियर: कंपनी टाटा हॅरियरवर 40,000 पर्यंत सूट देत आहे. या SUV ची किंमत 13.84 लाख ते 21.09 लाख रुपये आहे.
सफारी: टाटा सफारीचा KZR प्रकार वगळता, इतर सर्वांवर 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Safari KZR रु. 60,000 पर्यंतच्या सूटसह उपलब्ध आहे (रु. 20,000 रोख आणि रु. 40,000 बदल्यात).
Tiago: Tata Tiago च्या AMT आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर 30,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.
Tigor: Tata Tigor च्या पेट्रोल आणि CNG व्हेरियंटवर 30,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Hyundai च्या वाहनांवरील सवलत
कोना इलेक्ट्रिक: कोना इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत 23.84 लाख ते 24.03 लाख रुपये आहे. यावर एक लाख रुपयांची रोख सूट दिली जात आहे.
Grand i10 Nios: ग्रँड i10 Nios 35,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि टर्बो एडिशनवर 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देत आहे.
i20: Hyundai i20 वर 10,000 रुपयांची सूट आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह ऑफर केली जात आहे.
Aura: Aura च्या CNG-चालित प्रकारावर 33,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर, इतर व्हेरियंटवर 18,000 रुपयांपर्यंत सूट आहे.

रेनॉल्टच्या वाहनांवरील सवलत
Renault Triber: या कारवर 50 हजार रुपयांची सूट आहे. यामध्ये 15,000 रुपयांची रोख सवलत, 25,000 रुपयांचे एक्सचेंज आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
Renault Kwid: या कारवर 35 हजार रुपयांपर्यंत सूट आहे.
Renault Kiger: कंपनीकडून या कारवर फक्त 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!