परभणीमध्ये बस कंडक्टर आणि आणि महिला प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक महिला प्रवाशी आणि बसची महिला वाहक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी (Free Style Fight) झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हि घटना परभणी जिल्ह्यातील राणी सावरगाव या ठिकाणी घडली आहे. या व्हिडिओमध्ये महिला वाहक महिला प्रवाशाच्या केसाला धरून ओढत (Free Style Fight) असल्याचे दिसत आहे.

काय घडले नेमके?
गंगाखेड येथून राणी सावरगावकडे जात असलेल्या बसमध्ये (Free Style Fight) हि घटना घडली आहे. अगोदरच्या स्टॉपला का उतरली नाही, असं म्हणून एसटीच्या महिला वाहक आणि प्रवासी महिला यांच्यात भांडण झाले. यानंतर या भांडणाचे रूपांतर नंतर हाणामारीत (Free Style Fight) झाले. वाहक महिलेनं प्रवासी महिलेचे केस ओढून तिला मारहाण केली.

या हाणामारीचा व्हिडिओ (Free Style Fight) बसमधील काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी दोन्ही महिलांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…