हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र राज्य हे निसर्गरम्य सौंदर्याने नटलेले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आपल्याला अचंबित करणारे नजारे पाहायला मिळतील. यात जर तुम्ही कोकण भागात गेला तर तुम्हाला नैसर्गिक चमत्कारांचे विविध अनुभव पाहिला मिळतील. याच कोकण भागामध्ये असं एक ठिकाण आहे जेथे नदी आणि सागराची भेट होते. म्हणजे येथे गेल्यानंतर तुम्हाला नदी सागराची कशी मिळते हे पाहता येते. त्यामुळे हे ठिकाण कोठे आहे याविषयी माहिती जाणून घ्या.
कोठे आहे हे ठिकाण?
महाराष्ट्रामध्ये कोकण (Kokan) भागाला पृथ्वीवरचा स्वर्ग मानले जाते. कोकणातील झाडे निसर्गरम्य दृश्य डोंगरदऱ्या आणि समुद्र पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करतो. याच कोकण भागामध्ये संगम बेट (Sangam Point) नावाचे बेट आहे. हे बेट नदी आणि समुद्राच्या अद्भूत मिलनामुळे तयार झाले आहे. याठिकाणी कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो. यामुळेच देवबाग समुद्र किनारा पाहण्यासाठी लोक लांबून येतात. सायंकाळच्या वेळी तर समुद्रकिनारावरील नजारा पाहणे स्वर्ग पाहिल्यासारखा अनुभव देण्यासारखे असते.
कसे जाता येईल?
सिंधुदुर्ग येथील देवबाग समुद्र (Devbag Sea) हा मालवणपासून 12 कि.मी. अंतरावर आहे. तसेच तारकर्लीपासून 6 किलोमीटरवर आहे. तुम्हाला कोकण रेल्वेने कुडाळ स्टेशनला उतरुन येथे जाता येऊ शकते. यासह मालवणपर्यंत थेट बस देखील तुम्हाला मिळू शकते. देवबागमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोकणातील अचंबित करणारे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतील. तसेच येथे राहणारा तुम्ही विचार करत असाल तर वेगवेगळी हॉटेल तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. या भागात काही कुटुंब स्वतःची खानावळ देखील चालवतात. जेथे तुम्ही कोकणाच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
देवबागमध्ये तुम्हाला समुद्रापासून खूप कमी अंतरावर असलेली हॉटेल्स आणि कॉटेजेस मिळून जातील. या हॉटेलमध्ये तुमची योग्यरीत्या जेवणाची सोय देखील होईल. तसेच खूप जवळ तुम्हाला समुद्र पाहता येईल. देवबागमधील समुद्र पाहण्यासाठी खूप लांबून लोक येत असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर याठिकाणी प्रचंड गर्दी दिसून येते. येथे आल्यानंतर पर्यटकांना कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही देखील नक्की जा.