काॅंग्रेसच्या निवडी जाहीर : पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील आणि अजित पाटील- चिखलीकर यांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सरचिटणीसपदी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर कार्यकारी समितीवर अजितराव पाटील-चिखलीकर यांची वर्णी लागलीय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.

काँग्रेस समितीकडून करण्यात आलेल्या निवडीत कऱ्हाड तालुक्यातील या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. ॲड. उदयसिंह पाटील यांच्यावर राज्यपातळीवर सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आलीय. काका- बाबा गटाने मागील वर्षी जुळवून घेवून कॉंग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

ॲड. उदयसिंह पाटील यांना आणखी बळ मिळावे, या हेतूने कॉंग्रेसने त्यांच्यावर राज्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे उंडाळकरांच्या रयत संघटनेत आनंदाचे वातावरण आहे. कॉंग्रेस पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून परिचित असणारे अजितराव पाटील-चिखलीकर यांची कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीवर निवड करण्यात आली आहे.