नवी दिल्ली । कानपूर पोलिस हत्याकांडातील प्रमुख आरोपी गँगस्टर विकास दुबे याला अटक केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कानपूर येथे झालेल्या ८ पोलिसांच्या हत्येप्रकरणी प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर अपयशी असल्याचा आरोप केला आहे. कानपूर हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याच्या अटकेवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.विकास दुबेचे उज्जैनपर्यंत पोहोचणे हे संगनमत असल्याकडे अंगुलीनिर्देश त्यांनी केला आहे.
प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्ये उत्तर प्रदेश सरकारवर टीका करत म्हटलं कि, ‘कानपूरच्या या अमानुष हत्याकांडात उत्तर प्रदेश सरकारने ज्या तातडीने काम करायला पाहिजे होते, ते पाहत हे सरकार पूर्णपणे अपयशी असल्याचे सिद्ध झाले आहे. सतर्कतेनंतरही आरोपीचे उजैनपर्यंत पोहोचणे, हे केवळ सुरक्षेच्या दाव्यांचीच पोलखोल करत नाही, तर संगनमताकडेही इशारा करत आहे.’
३ महिने जुने असलेल्या पत्रावर ‘नो अक्शन’ आणि कुख्यात गुन्हेगारांच्या यादीत विकास दुबेचे नाव नसणे याचा अर्थ या प्रकरणाचे धागेदोरे दूरपर्यंत पोहोचले आहेत, असे प्रियांका म्हणाल्या. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून सर्व सत्य आणि संरक्षण देण्याशी संबधित सर्व संबंधांबाबत माहिती दिली पाहिजे, असेही प्रियांका म्हणाल्या.
… तीन महीने पुराने पत्र पर ‘नो एक्शन’ और कुख्यात अपराधियों की सूची में ‘विकास’ का नाम न होना बताता है कि इस मामले के तार दूर तक जुड़े हैं।
यूपी सरकार को मामले की CBI जांच करा सभी तथ्यों और प्रोटेक्शन के ताल्लुकातों को जगज़ाहिर करना चाहिए। 2/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 9, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”