नवी दिल्ली । मोदी सरकारनं देशात अनलॉक जाहीर केल्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येबरोबरच इंधनाचेही दर वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. यावर लक्ष वेधत ‘मोदी सरकारनं करोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत”, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे.
काही दिवस राहुल गांधी यांनी लॉकडाउन अयशस्वी झाल्याचा दावा करत त्याचे आलेखही शेअर केले होते. आज केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती व कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून सरकारला लक्ष्य केलं आहे. आलेख शेअर करत ‘मोदी सरकारनं करोना महामारी व पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत,’ अशी टीका राहुल यांनी केली आहे.
मोदी सरकार ने कोरोना महामारी और पेट्रोल-डीज़ल की क़ीमतें “अन्लॉक” कर दी हैं। pic.twitter.com/ty4aeZVTxq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 24, 2020
कोरोनामुळे देशातील आरोग्यावर व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. लॉकडाउन असेपर्यंत रुग्णवाढीचा वेग नियंत्रणात होता. मात्र, केंद्र सरकारनं अनलॉक जाहीर केल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे.अनलॉक जाहीर झाल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या दरही रोज वाढत जाऊन त्यांनी उचांक गाठला आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या व इंधनाचे दर वाढत आहेत त्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”