अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात सलग तीनदा विजयी झालेल्या काँग्रेसच्या आक्रमक फायर ब्रँड नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आज विधानभवनात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच त्यांचे गाव असलेल्या तिवसा मतदार संघातील मोझरी गावात त्यांच्या कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरत, गुलालाची उधळण करून फटाक्यांच्या आतषबाजीत आनंद साजरा केला आहे. यशोमती ठाकूर या एक दबंग नेत्या म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळाची भीषणता वाढली होती. तेव्हा पाण्यासाठी लोकांची वणवण सुरु होती. अशातच काही राजकीय पक्षांकडून दुष्काळी दौरेही आयोजित करण्यात आले आहे.
तेव्हा यशोमती ठाकूर या अमरावतीच्या पाणी प्रश्नासाठी झटल्या होत्या. अशी अनेक कामे त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पार पाडली आहेत. आता ही त्यांनी शपथ घेताच लगेच कामाला लागणार असल्याची पतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अमरावती जिल्ह्यात एकच जल्लोष सुरु झाला आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिक याठिकाणी आनंद साजरा करताना दिसत आहेत.