उद्या मोदींचा मृत्यू झाला तर…. काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून सर्वच राजकीय नेतेमंडळी विरोधी पक्षांवर सडकून टीका करत आहेत. आपणच चांगले कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सर्वांकडून सुरु आहे. जाहीर सभा आणि भाषणांचा धुरळा उडालेला आहे. अशात आपण काय बोलतोय याचेही भान नेत्यांना राहत नाही. अशीच एक घटना कर्नाटकात घडली आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे आमदार राजू कागे (Raju Kage) यांनी पुन्हा एकदा बेताल विधान केलं आहे उद्या मोदींचा (Narendra Modi) मृत्यू झाला तर दुसरा कोणी पंतप्रधान होणार नाही? अस वादग्रस्त विधान राजू कागे यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

राजू कागे एका जाहीर सभेत बोलताना म्हणले कि, मी ग्रॅज्युएट आहे, माझ्याकडेही मेंदू आहे आणि मी एक बुद्धिमान व्यक्ती आहे… मला विश्वास आहे की मी देश चांगल्या प्रकारे चालवू शकतो. उद्या मोदींचा मृत्यू झाला तर दुसरा कोणी पंतप्रधान होणार नाही? आपल्या देशाची लोकसंख्या 1.4 कोटी कोटी आहे, मग यामध्ये पंतप्रधान होऊ शकतो असा एकही व्यक्ती नाही का? असा तिखट सवाल राजू कागे यांनी केला.

भाजपने दिले प्रत्युत्तर –

राजू कागे यांनी मोदींबाबत केलेल्या या विधानाचा भाजपने खरपूस संचार घेतला आहे. कर्नाटक भाजपने आपल्या X हँडलवरून राजू कागे यांचा विडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. . भाजपने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले, “काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी पुन्हा एकदा आपली अनियंत्रित जीभ सोडली आहे. जर टीका करण्यासारख्या गोष्टी नसतील तर भ्याडांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मृत्यू हवा आहे. परंतु मोदींना 140 कोटी भारतीयांचा आशीर्वाद आहे. जितके जास्त काँग्रेसवाले मोदींच्या मृत्यूची वाट बघतील तितकं जास्त त्यांना जीवन मिळेल असं म्हणत भाजपने राजू कागे यांच्यावर पलटवार केला.