मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंना काँग्रेस पाठिंबा देणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघामधील प्राथमिक कल हाती आले आहेत. मतमोजणीच्या कलांनुसार भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युतीचा होणार याबद्दल दुमत नाही. पण प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सभेत भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे म्हटले होते.

सेनेचे संजय राऊत यांच्याकडून ५०-५० चा फॉम्युला सांगण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचा की शिवसेनेचा अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. “भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल”, असे ट्विट सावंत यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान करणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघामधील प्राथमिक कल हाती आले आहेत. शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळीमधून आघाडीवर आहेत. आदित्य यांना सोळा हजार मतांची आघाडी मिळाली आहे.

 

Leave a Comment