तांबे पक्षातून निलंबित; काँग्रेसची मोठी कारवाई

sudhir tambe satyajeet tambe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊनही अर्ज न भरल्याने काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सुधीर तांबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित असणार आहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. उलट आपले सुपुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज भरत खळबळ उडवून दिली. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसने केली होती. त्यामुळे आता चौकशी होईपर्यंत सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.