हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विविध ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांच्या गावची काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर हे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवांनंतर काँग्रेसने त्यांना टोला लगावला आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे. काय मग गोगावले कसं वाटतंय आता? असं म्हणत काँग्रेसने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच असे पराभव पचवायची सवय करून घ्या कारण यापुढे गद्दारांना अशीच धूळ चारली जाणार! असा इशाराही दिला.
https://www.facebook.com/100068907622179/posts/pfbid0JSKTPmUSWvvhFkyyYC9XYngw1C6FySkomyig5rRabPvm6dMJdFr5MEdRXc1hpc9ql/
गोगावले यांच्या गावात शिंदे गटाचे जास्त सदस्य जिंकून आले असले तरी सरपंचपदी मात्र महाविकास आघाडीचे चैतन्य महामुणकर विजयी झाले. भरत गोगवले हे सध्या शिंदे गटातील आघाडीचे नेते असून विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतोदही आहेत. मंत्रिपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांच्याच गावात महाविकास आघाडीचा सरपंच निवडून आल्याने गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.