हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना केंद्र सरकारनं ‘Y’ सुरक्षा पुरवण्याचा जाहीर केले आहे त्यानंतर. एका माध्यमाला मुलाखत देताना पूनावाला यांनी त्यांना बडे नेते जीवे मारण्याची धमकी देतात असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ‘काँग्रेस तुम्हाला पूर्ण सुरक्षा देईल पण तुम्ही देशातले लसीचे उत्पादन चालूच ठेवा असे म्हणत, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली आहे. याबरोबरच तुम्हाला धमकी देणाऱ्या बड्या नेत्याचे नाव तुम्ही सर्व सामान्य लोकांसमोर आणावे ‘असं देखील नाना पटोले यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
याबाबत बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, ‘लस पुरवण्याचा मोठं काम आदर पूनावला यांच्याकडे असताना काही मोठे नेते माझ्यावर दबाव आणतात मी जर बोललो तर माझा शिरच्छेद होईल असा मोठा खुलासा त्याने केला आहे ते नेते कोण आहेत हे उघड झालं पाहिजे कोणावर यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी काँग्रेस घेईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे’.
लस पुरवण्याचे मोठे काम अदर पूनावाला यांच्याकडे असताना "काही मोठे नेते माझ्यावर दबाव आणतायत. मी जर बोललो तर माझा शिरच्छेद होईल" असा मोठा खुलासा त्यांनी केला. ते नेते कोण आहेत हे उघड झालंच पाहिजे. पूनावालांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी काँग्रेस घेईल: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले pic.twitter.com/E2NeDOOLeD
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 3, 2021
काय आहे प्रकरण ?
अदर पुनावाला सध्या परदेशात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘टाईम्स’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीने आता उद्योजकांच्या मनात धडकी भरवली आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून गंभीर स्वरूपाचे फोन कॉल्स येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.