काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव आघाडीवर ? ‘या’ ३ दावेदारांमध्ये चुरस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेस अंतर्गत वाद आणि रखडलेली पक्षाध्यक्षाची निवड या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्य समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. पण राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यात सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत यांची नावं शर्यतीत असल्याचं समजतं. अशोक गेहलोत राज्य सोडण्यास अनुत्सुक असल्याने काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या दीड वर्षांपासून काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा तिढा सुटताना दिसत नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाली होती. यानंतर सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं. परंतु त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे आता काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याची समोर आलं. मात्र, राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबाच्या विश्वासातील नावं चर्चेत आहेत. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत ही ३ नावं पुढे आली आहेत.

दरम्यान, या नावांपैकी अशोक गेहलोत राज्य सोडून दिल्लीत जाण्यास तयार नसल्याने सुशीलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा रंगते. आता एका गटाकडून सुशीलकुमार शिंदे यांचं नाव पुढे आलं आहे. परंतु शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे महाधिवेशनाबरोबरच नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतले जाणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं गांधी कुटुंबातील की गांधी कुटुंबाखेरीज व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होणार हे पाहणं उत्सुकचे असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’