31 मार्चपूर्वी आपले पॅन कार्ड आधार सोबत कनेक्ट करा आणि मोठे नुकसान टाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | देशातील नागरिकांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहेत. अनेक शासकीय योजनांसाठी आणि सरकार दरबारी कामासाठी या दोन गोष्टी अत्यावश्यक डॉक्युमेंट्समध्ये येतात. इन्कम टॅक्स रिटर्न करतानाही पॅन कार्ड व आधार नंबर देणे आवश्यक असते. पॅन कार्ड हे, आधार कार्ड सोबत लिंक करणे सरकारने बंधनकारक केले आहे. लिंक करण्याची मुदत वाढवून सरकारने ती 31 मार्च 2019 केली आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत पॅन कार्ड हे आधार कार्डसोबत लिंक न केल्यास दंड होऊ शकतो. सोबतच, पॅन कार्ड इनॅक्टिवेट होईल.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या काळामध्ये पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर, पॅन कार्ड इनॅक्टिव होईल. यासोबतच आयकर कायद्याच्या कलम 272 च्या बी नुसार दहा हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. यामुळे लवकरात लवकर आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याचे आवाहन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केले आहे.

जर तुम्ही स्वतः पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करणार असाल तर, आपल्या स्मार्टफोनवरून http://www.incometaxindiaefiling.gov.in या साइटवर जा. येथे लिंक आधारचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. नवीन ओपन झालेल्या विंडोमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, नाव आणि क्यापचा भरून ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. यानंतर आपले आधार कार्ड लिंक होईल. तसेच, आपण एसएमस (मेसेज) द्वारेही आधार कार्ड लिंक करू शकता. यासाठी 567578 किंवा 56161 या नंबरवर UIDAIPAN असा मेसेज करून पाठवावा. या सोप्प्या पद्धतीने आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.