बिहारमध्ये माझा बलात्कार व हत्या करण्याचा हेतू होता; अभिनेत्री अमिषा पटेल

मुंबई | अभिनेत्री अमिषा पटेल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बिहार निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी गेली असताना माझा बलात्कार आणि हत्या करण्याचा कट होता. अमिषा पटेल यांनी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे मोठे नेते प्रकाश चंद्रा यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे.

अमिषा पटेल या बिहार निवडणुकीच्या वेळी प्रचारासाठी गेल्या असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले. यासोबत त्या असेही म्हणाल्या की, प्रचारादरम्यान त्यांनी मला जबरदस्तीने प्रचारासोबत त्यांच्याविषयी चांगले बोलण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी फोन करून वारंवार मला धमकी दिली. सोबतच, नंतर त्यांनी जे घडले त्याविषयी कोणाशी बोलू नका. हवे तर मी पैसे देतो. पण माझ्याविषयी चांगले बोला असा आग्रह धरला. असा आरोप अमिषा पटेल यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

यासोबत, ज्यांच्या प्रचारासाठी मी गेले होते त्यांच्याविषयी मी ऐकून होते. हे धमकवतात, ब्लॅकमेल करतात असे मला समजले होते. पण हे माझ्यासोबतच घडेल असे मला वाटले नव्हते. मी बिहारमध्ये असल्यामुळे त्यावेळी गप्प बसले. पण मुंबई मध्ये आल्यानंतर याबदल बोलले होते. यांचे खरे रूप मला जगाला दाखवून द्यायचे आहे. लोक किती वेगळी असतात हे मला जगाला सांगायचे आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like