Thursday, March 23, 2023

लाॅकडाऊनचा परिणाम ः खेरदीसाठी गर्दीच गर्दी, वाहतूकीची कोंडीच कोडी

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आज पासून राज्यात रात्री आठ नतंर कडक लाॅकडाऊनची अमंलबजाणी होणार आहे. त्यातच सकाळी सात ते आकरा अत्यवश्यक सेवांचा लाभ घेण्यासाठी सकाळपासून शहर व परिसरात गर्दी झाली होती. त्यामुळे आज सकाळी येथील कृष्णा कॅनालवर वहातूकीची कोंडी झाली. अकराच्या आत खरेदी व घरी जाण्याच्या घाईमुळे शहरातील मंडई व कृष्णा नाका, कृष्णा कॅनाॅल परिसरात मोठी गर्दी झाली होती. ओगलेवाडी, विद्यानगर व कराड शहरातून येणा-जाणार्‍या वाहनांमुळे चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती.

- Advertisement -

सकाळी 11 वाजता बाजारपेठ तसेच किराणा मालाची दुकाने बंद होणार असल्याने लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. शासनाने कोरोना प्रादुर्भाव दूर करण्यासाठी लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळवा म्हणून निर्बंध घातलेले आहेत. परंतु खरेदीच्या व अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली लोकांनी ठराविक वेळेसाठी गर्दी केली जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

लाॅकडाऊनच्या अगोदर खरेदी करण्याच्या नादात शहरातील अनेक मुख्य चाैकात वाहनांची तसेच लोकांची गर्दी दिसून आली. या गर्दीमुळे वाहनचालकांनाही व पायी चालणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. तर काही लोकांच्यावर पोलिसांनी कारवाईही केली.