कोरोना परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या यात्रेबद्दल अमरनाथ देवस्थान बोर्डाने घेतला महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण देखील वाढला आहे. कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेता श्री अमरनाथ देवस्थान बोर्डाने या यात्रेची नोंदणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

देवस्थान मंडळाचे सध्याच्या परिस्थितीवर लक्ष आहे परिस्थितीमध्ये सुधारणा होताच पुन्हा नोंदणी सुरू करण्यात येणार आहे असं देवस्थान बोर्डाने स्पष्ट केले आहे. या वर्षी 28 जून 2021 ते 22 ऑगस्ट 2019 या काळात अमरनाथ यात्रा होणार होती. दोन वर्षांनंतर प्रथम यात्रेचा पूर्ण कालावधी निश्चित करण्यात आला होता यापूर्वी 2019 मध्ये 370 कलम रद्द झाल्यामुळे यात्रा निश्चित तारखेपर्यंत पूर्ण करण्यात आली नव्हती. तर 2020 मध्ये covid-19 मुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. दरम्यान 2021 मध्ये तरी भाविकांना दर्शन घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र कोरोना व्हायरस मुळे आता पुन्हा एकदा या यात्रेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. एका दिवसात देशात तब्बल ३ लाख 14 हजार 835 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील रुग्ण वाढीची ही रेकॉर्डब्रेक संख्या आहे. तर मागील 24 तासात 2,104 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्याने वाढलेल्या कोरोना रुग्णामुळे देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी १ कोटी 59 लाख 30 हजार 965 इतकी झाली आहे. मागील 24 तासात देशात १ लाख 77 हजार 841 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 आहे .आतापर्यंत देशात कोरोनामुळे एक लाख 84 हजार 657 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर सध्या देशात 22 लाख 91 हजार 428 हजारांवर कोरोना वरील उपचार विविध रुग्णालयात सुरू आहेत. देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण केले जाणार आहे. देशात सध्या 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 जणांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Leave a Comment