जिल्ह्याला दिलासा ः सोना अलॉज् कंपनीतील ऑक्सिजन प्लँटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | लोणंद येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लँट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरु करण्यात आला. या प्लँटचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, प्रातांधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार दशरथ काळे, धिरज चंद्रा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रदिप राऊत आदि उपस्थित होते.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/3996414483748173

सोना अलॉज् पोलाद निर्मितीची कंपनी असून येथील बंद असलेला ऑक्सिजन प्लँट लोक प्रितिनिधी व प्रशासनाच्या प्रयत्नातुन सुरु करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लँटमधून रोज ऑक्सिजनचे 1500 सिलेंडर भरले जातील. यामुळे जिल्ह्याची बहुतांशी ऑक्सिजनची गरज पुरविण्यास मदत होणार आहे. यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment